minor girl molestation file photo
ठाणे

Badlapur school bus case: बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार

बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूलबसमध्येच बस चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Badlapur school bus case

बदलापूर: बदलापूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूलबसमध्येच बस चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे या स्कूल बसमध्ये कोणतीही महिला मदतीस नव्हती.

बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणारी ही स्कुल बस आहे. शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना बस चालकाने बसमध्ये तिचा विनयभंगा केला. यानंतर पीडित विद्यार्थिनीने पालकांना घडलेली घटना सांगितली. पीडितेच्या पालकांनी या संदर्भात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बदलापुरात एक महिन्यापूर्वी स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनींचं चालकाने लैंगिक शोषण केल्याची घटना घडूनही शहरातील शाळा, शिक्षण विभाग प्रशासन आणि RTO याबाबत गंभीर नसल्याने या घटनांची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी न घेणाऱ्या शाळांवर निर्बंध : रूपाली चाकणकर

बदलापुरात एक महिन्यापूर्वी खासगी शाळेच्या बसमध्ये ४ वर्षाच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. त्या शाळेवर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी या शाळांवर कारवाईची आदेश दिले असल्याचे सांगितले. "शाळांचे नोंदणी, विद्यार्थ्यांच्या वाहतुकी संदर्भातील सुरक्षेचा विषय, या बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जाईल. ज्या शाळांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही, पैशाच्या मोहापाई शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या शाळांवर निर्बंध घातले जातील. तशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत," असे चाकणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT