ठाणे

भिवंडी : गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील निरीक्षकास बेदम मारहाण

अविनाश सुतार

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : भिवंडी येथील गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी वर्गणी देण्यास नकार देणाऱ्या केंद्रीय गुप्ता वार्ता विभागातील अधिकाऱ्याला सरकारी कार्यालयातच बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जखमी अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शांतीनगर पोलीस ठाण्यात मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विश्वनाथ बाळाराम पाटील (वय 36), प्रतीक विलास बोरसे (26), सुनील राधाकिशन राहुलवार (33), जतिशर मेशफुलोरे (27), सागर पंढरीनाथ पाटील (25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, केंद्रीय गुप्त वार्ता विभागाचे भिवंडी टेमघर येथील एका इमारतीत कार्यालय आहे. दहीहंडीच्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार असल्याने शहराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे निरीक्षक सुखसागर कुंदनसिंग रावत यांच्यावर होती. त्यामुळे कार्यालयात काम करत बसलेल्या रवत यांच्याकडे साई श्रद्धा या गणपती मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवाची वर्गणी मागण्यासाठी दुपारी कार्यालयात गेले.

यावेळी आपण वर्गणी देणार नाही, असे रावत यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी रावत यांना मारहाण करत त्यांचा गळा आवळला. त्यामुळे रावत बेशुध्द झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयातून पळ काढला. शांतीनगर पोलिसांनी तातडीने शोध घेऊन मंडळाचे पदाधिकारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार काबाडी करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT