Ambivli Shahad bridge Pudhari
ठाणे

Ambivli Shahad bridge: ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा होणार? आंबिवली-शहाडदरम्यान सहापदरी पुलाची तयारी

एमएमआरडीएकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना; तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: आंबिवली ते शहाड दरम्यान उल्हास नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन जुन्या पुलाला पर्याय म्हणून त्यालाच समांतर सहा पदरी भव्य नवीन पूल बांधण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने या नवीन पुलासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या पुलासाठी आवश्यक असलेली जमीन, रस्त्याची लांबी-रूंदी, प्रस्तावित नकाशा आणि तांत्रिक माहितीसह अहवाल देण्याच्या सूचना एमएमआरडीएने केडीएमसीच्या शहर अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात केल्या आहेत.

अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर एमएमआरडीए या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे लवकरच या महत्त्वाकांक्षी पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेला अरूंद ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीचा ताण सहन करू शकत नाही. इथे दररोज वाहतूक कोंडी होते. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या वाहनांनाही विलंबाचा सामना करावा लागतो. अनेक वेळा जीव वाचवण्यासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिका या कोंडीत अडकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT