Health Department Officers Suspended: आरोग्य विभागाचे दोन अधिकारी तडकाफडकी निलंबित

कुटुंब नियोजन आणि बालआरोग्य कार्यक्रमातील दुर्लक्षाचा ठपका; दोघांविरुद्ध विभागीय चौकशी
Suspended
SuspendedPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: बालआरोग्य आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमांच्या कामकाजात दुर्लक्ष केल्याप्रकरणी पुणे येथील आरोग्य सेवा (कुटुंबकल्याण) विभागाचे सहायक संचालक डॉ. राजकुमार जगताप आणि डॉ. राजश्री गजानन ढवळे यांना निलंबित करण्‍यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले असून, लातूर मंडळाच्या उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार मधुकर साळुंके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Suspended
Konkan Railway Marathi language: महाराष्ट्रात मुख्यालय, कोकणात सर्वाधिक मार्ग; तरी कोकण रेल्वेच्या वेबसाइटवर मराठी १४ व्या क्रमांकावर!

डॉ. जगताप यांच्याकडे बालआरोग्य कार्यक्रमाची, तर डॉ. ढवळे यांच्याकडे कुटुंब नियोजन कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, क्षेत्रभेटी न घेणे, नियंत्रण व पर्यवेक्षणाची जबाबदारी योग्य प्रकारे पार न पाडणे आणि सद्यस्थितीबाबत समाधानकारक माहिती सादर न करणे, या त्रुटी निदर्शनास आल्या. संबंधित कार्यक्रमांकडे गंभीर दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news