कळवा-मुंब्रा मतदारसंघात आव्हाडांच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी  File Photo
ठाणे

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात कळवा-मुंब्रा मतदारसंघातून अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढवणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

कळवा-मुंब्रा विधानसभेचे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवरांची राष्ट्रवादी उमेदवार देणार आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

महायुतीकडून नजीब मुल्ला यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या त्यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा मतदार संघासाठी महायुती सरकारने विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यातील 50 कोटींचा निधी दिला आहे.

त्यामुळे कळवा-मुंब्रा या ठिकाणी महायुती उमेदवार देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्‍ला यांच्यात काटे की टक्‍कर होणार असल्‍याचे दिसून येत आहे. यामुळे घड्याळ आणि तुतारीत चांगलाच सामना रंगणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT