ठाणे

डोंबिवली रेल्वे पुलावर तरुणाला बेदम मारहाण

अनुराधा कोरवी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर ते डोंबिवली प्रवास करून डोंबिवली स्थानकात उतरलेल्या प्रवाशाला अनोळखी दोघांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात बुधवारी (दि.१५) सायंकाळी घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसात तक्रार  दाखल करण्यात आली आहे. सागर भिसे (वय २७) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, सागर हा अंबरनाथ फास्ट लोकलने घाटकोपर येथून प्रवास करत होता. त्यानंतर तो डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून रेल्वे पुलावरून जात असताना त्याच्याकडून चुकून एका प्रवाशाला धक्का लागला. त्याने प्रवाशाची माफी मागितली. यानंतर तो पुढे निघाला होता. मात्र, सागरच्या मागे असलेले दोघा अनोळखी व्‍यक्‍तींनी या कारणावरून सागरशी हुज्जत घातली.  मी त्यांची माफी मागितली आहे तुम्ही मध्ये का बोलता? असा प्रश्न सागरने विचारल्यानंतर दोघांनी सागरला बेदम मारहाण केली. यासंदर्भात सागरने रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT