

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : मूळ भारतीय सुनीता विल्यम्स बोईंगच्या कॅप्सूलने अंतराळात जाणार आहेत. 'नासा'ची ही मोहीम यशस्वी झाल्यास लवकरच अंतराळ पर्यटनाला सुरुवात केली जाईल.
बोईंग या विमान उत्पादक कंपनीने अंतराळ स्थानक बनविण्याची आणि अंतराळ पर्यटन सुरू करण्याची योजना 'नासा'च्या मदतीने आखली आहे. बोईंगने यापूर्वी मानवाशिवाय कॅप्सूल पाठविल्या आहेत. आता माणसांची वेळ आहे. बुच विल्मर आणि सुनीता विल्यम्सची निवड त्यासाठी झाली आहे. ही मोहीम जुलै 2022 मध्येच पार पडणार होती; पण कोरोनामुळे ती पुढे ढकलली गेली. आता एप्रिलच्या दुसर्या वा तिसर्या आठवड्यात बोईंग स्टारलायनर कॅलिप्सो नावाचे एक लहान यान दोन अंतराळवीरांसह अंतराळासाठी उड्डाण घेईल. दोन आठवडे हे दोघे अंतराळ स्थानकात राहतील.