आषाढी यात्रेत ९ लाख ५३ हजार वारकऱ्यांनी एसटी प्रवास केला. Pudhari File Photo
ठाणे

आषाढी यात्रेत ९ लाख ५३ हजार वारकऱ्यांनी केला एसटी प्रवास

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या ५ हजार बसेसव्दारे १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ९ लाख ५३ हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २८ कोटी ९२ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल, असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT