Ashadhi Wari 2024 | आषाढी एकादशीनिमित्त दिल्लीत विठू नामाचा गजर

विठ्ठल मंदिरापर्यंत सांकेतिक वारीचे आयोजन
Ashadhi  Wari 2024
दिल्लीत विठ्ठल मंदिरापर्यंत सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आले होते. Pudhari News Network

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त देशाची राजधानी दिल्लीत विठू नामाचा गजर झाला. पंढरपुरात जनसागर उसळला असताना दिल्लीत कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिर ते आर. के. पुरम भागातील विठ्ठल मंदिरापर्यंत सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आले होते. या वारीमध्ये दिल्लीतील मराठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. या सांकेतिक वारीमध्ये नेते मंडळींनीही सहभाग घेतला.

Ashadhi  Wari 2024
Ashadhi Wari 2024|आषाढी एकादशीनिमित्त राजधानी दिल्लीत सांकेतिक वारी

विठ्ठल मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम आयोजित

दरवर्षीप्रमाणे यंदाही सांकेतिक वारीच्या निमित्ताने दिल्लीकर मराठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. सकाळी ६ पासून सुरु झालेली वारी १० वाजता विठ्ठल मंदिरात पोहोचली. विठ्ठल मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नादब्रम्ह सोनवणे महाराज भजन मंडळ, मुंबई यांच्यासह उपस्थितांनी भजन गायले. यानंतर जग्गनाथ महाराज सोनवणे यांचे किर्तनही झाले.

Ashadhi  Wari 2024
वारकऱ्यांसाठी खुशखबर|आषाढी वारी करणाऱ्या दिंड्यांना मिळणार 68 लाख रुपये

सांकेतिक वारीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा, भाजपच्या खासदार बांसुरी स्वराज, खासदार मनोज तिवारी यांनीही सहभाग घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news