पंधरा डब्यांच्या फलाट विस्तारासाठी मेगा ब्लॉक यशस्वी pudhari photo
ठाणे

Railway mega block success : पंधरा डब्यांच्या फलाट विस्तारासाठी मेगा ब्लॉक यशस्वी

ठाणे, डोंबिवलीत रेल्वेच्या पायाभूत कामांसाठी 10 तासांचा ब्लॉक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मध्य रेल्वेने 21 व 22 मार्च रोजी ठाणे, डोंबिवलीत पंधरा डब्यांच्या फलाट विस्तारासाठी घेण्यात आलेला 10 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक यशस्वी केला आहे. पंधरा डब्यांच्या उपनगरीय गाड्या सामावून घेण्यासाठी, ठाणे आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी संबंधित महत्त्वपूर्ण पायाभूत कामांच्या अंमलबजावणीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता.

ठाणेच्या प्लॅटफॉर्म क्र. 1, 2, 3 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाजू आणि डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्र. 1 ए, 1 व 2 येथे अप आणि डाऊन उपनगरीय मार्गांवर हा महत्वपूर्ण ब्लॉक घेण्यात आला.

डोंबिवली येथे हाती घेण्यात आलेली कामे पाहता येथे रेल्वे मार्ग आणि पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. यामध्ये पॉइंट क्र. 125 डब्ल्यू काढून टाकणे व तो पुन्हा बसवणे, तसेच 4-5 मीटरचे - स्ल्यूइंग, मार्गाचे अंशतः स्थलांतर करून नव्याने टाकलेल्या 150 मीटर लांबीच्या सरळ मार्गाशी जोडलेला नवीन 125 डब्ल्यू क्रॉसओव्हर कार्यान्वित करणे, या कामांचा समावेश होता.

या कामामध्ये 7 ओएचई मास्ट्स/पोर्टल्स पाडणे, डाऊन लोकल लाईनच्या बाजूने महत्त्वाच्या केबलिंगचे स्थलांतर करणे, तसेच रुळांचे सरकवणे आणि प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी जागा निर्माण करणे यांचाही समावेश होता.

जागेची कमतरता असूनही, अत्यंत काटेकोर नियोजनासह हे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. याव्यतिरिक्त, अप लोकल मार्गावर, किमी 48/200 आणि 47/200 च्या दरम्यान, दोन डीएसएल लोकोमोटिव्हसह 11 बीआरएन वॅगन्सचा वापर करून, 13-मीटर पॅनेल्स (10 नग) उतरवण्याचे आणि भंगार साहित्य हटवण्याचे काम पार पाडण्यात आले.

ठाणे येथे हाती घेण्यात आलेली कामे

ठाणे येथे डाऊन लोकल लाईनवर लक्षणीय प्रगती साधण्यात आली. यामध्ये हायड्रा, जेसीबी आणि पोकलेन यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर करून, क्रॉसओव्हर क्र. 148ए/बी चे जुने भाग काढून टाकणे आणि सुमारे 60 मीटर अंतरावर त्याची पुनर्स्थापना करणे, या कामांचा समावेश आहे.

तैनात मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री

या कामासाठी एकूण 380 कंत्राटी कामगार आणि 120 विभागीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. हे काम 14 अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आले. काम वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी 7 जेसीबी, 2 पोकलेन मशिन आणि 4 डंपर यांसारखी अवजड यंत्रसामग्री तैनात करण्यात आली होती. 15 डब्यांच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या संचालनासाठी फलाटाच्या विस्ताराचे सुरू असलेले काम सुलभ करण्यासाठी मध्य रेल्वेने अशाच प्रकारचे वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्याचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्याची योजना आखली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT