करमाळा ; पुढारी वृत्तसेवा : करमाळा येथे बळिराम गोविंद वारे (वय 46, रा. गणेशनगर, मूळगाव रत्नापूर, तालुका जामखेड जिल्हा, अहमदनगर) यांनी गुरुवारी (दि. 22 पहाटे तीनच्या सुमारास आर्थिक फसवणुकीतून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी याप्रकरणी फिर्याद बळिराम यांचा मुलगा अनिकेत बळिराम वारे (वय 19, रा. करमाळा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल रमेश मोहन यादव व हनुमंत ऊर्फ पप्पू आप्पा बागल (दोघेही रा. गुळसडी) यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे,
बळिराम वारे हे गुळसडी येथील विठामाई खंडागळे माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्याकडून संशयित आरोपींनी शेती खरेदी करण्यासाठी 14 लाख रुपये घेतले होते. परंतु, जमिनीची खरेदी न देता शेतात आलास तर हात पाय मोडून मारण्याची धमकी देत होते. अशी चिठ्ठी बळिराम वारे यांनी मृत्युपूर्वी लिहिल्याचे फिर्यादीत सांगितले.
त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी पत्नीच्या साडीने स्वयंपाक घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. सकाळी सात वाजता पत्नी रेखा वारे हे स्वयंपाक घरात काम करण्यास गेल्या असता हा प्रकार उघडकीस आला.
यावेळी आरडाओरडा झाल्याने शेजारच्या लोकांनी कात्रीच्या सहाय्याने साडी कापून खाली उतरवले व त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात करमाळा येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारीनी मृत झाल्याचे सांगितले.
दरम्यान सायंकाळी सहापर्यंत शवविच्छेदनानंतरही नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. करमाळा पोलिसानी याची प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती .उशीरानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला .याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप हे करत आहेत.