जळगाव : हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आज रात्री 10 वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. कोणीही नदीपात्रात जावू नये असा जिल्हा प्रशासनाने इशारा दिला आहे
तापी व पूर्णा नदीच्या उगम स्थानावर होणाऱ्या पावसामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज 22 जुलै रोजी रात्री 10 वाजता तापी नदीपात्रात 1 लाख 6 हजार 122 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.
पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रसाशनाने नदीपात्रात गेल्या काही तासात पाण्याची पातळी वाढणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचबरोबर कोणीही नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरणाची वॉटर लेव्हल 209.650 मीटर आहे तर ग्रॉस स्टोरेज 183.50 मी मी आहे धरणात ग्रॉसस्टोरेज47.29 टक्के आहे. सध्यला नदीपात्रात 1 लाख 6 हजार 122 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गेल्या 13 तासात हतनूर धरणाच्या परिसरात 9.3 मी मी पाऊस झाला आहे .
पुढील 24 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.
हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने आज रात्री 10 वाजता धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 1 लाख 6 हजार 122 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहेत.
तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे