सोलापूर

सोलापुरात पतीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा पाठलाग

backup backup

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : एखाद्या सिनेमात दाखविला जातो असा प्रसंग सोलापुरातील महिलेला अनुभवावा लागला. पतीला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत पतीच्या मित्रानेच पाठलाग करून विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून अनिल परगोंडा सातलगाव (वय ४५) याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीशी ओळख असल्याने आरोपीने त्याच्या मोबाईलमधून पीडितेचा मोबाईल नंबर घेतला, त्यानंतर सोशल मीडियावरून पीडितेला संदेश पाठवू लागला. याला पीडितेने कोणताचा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तो कामानिमित्त बाहेर पडलेल्या पीडितेचा पाठलाग करत होता.

दरम्यान, तो पीडितेला पाहून काही ना काही कृत्य करत असत. त्याच्याकडून होणाऱ्या या सततच्या त्रासाबद्दल पीडितेने आरोपीच्या नातेवाईकांनाही माहिती दिली. त्या सर्वांकडूनही त्याला समजावण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यानंतरही आरोपीकडून पीडितेचा पाठलाग करणे सुरुच होते. दरम्यान, जुलै महिन्यात वाटेत थांबवून आरोपीला पीडितेने पाठलाग थांबवण्याची विनंती केली. त्यावेळी तू मला हो म्हण, नाहीतर मी असचं तुझा पाठलाग करणार आणि जर तू हो म्हणाली नाही तर तुझा नवरा तर गेलाच आणि तुझे मुलं तरी घरी येतेत का बघ? अशी धमकी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT