सोलापूर : प्रियकराने प्रेमसंबंध प्रस्थापित करून शारिरीक संबंध ठेवले, मात्र लग्नाची वेळ आल्यावर दुसर्याच मुलीसोबत लग्न ठरवले. यातून नैराश्य आलेल्या प्रेयसीने घराच्या गच्चीवरून उडी मारून जीवन संपविले. विजापूर रोडवरील कृष्णाकॉलनी येथे हा प्रकार घडला. उमाजी दगडू दिंडोरे (वय 46, रा. कृष्णकॉलनी, विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दिंडोरे यांची मुलगी सावली उमाजी दिंडोरे (वय 19) हिचे दिनेश शंकरसिंग परदेशी (रा. कमला नगर, विजापूर रोड) याच्या सोबत डिसेंबर 2024 पासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून दिनेशने सावलीला लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले. परंतु त्यानंतर दिनेशने दुसर्याच मुलीसोबत विवाह ठरविला.
याबाबत सावलीने विचारणा केली असता, यापुढे मला फोन करू नको. माझ्या घरी आली तर बघ असे म्हणत शिवीगाळ केली. यातून नैराश्य आलेल्या सावलीने घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. दिनेश परदेशी याच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.