तुळजापूर : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ,धाराशिव इस्कॉन, व तुळजापूरच्या हरे कृष्ण भक्तांच्या वतीने आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंगल आरतीस भाविकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील जिजामाता नगरमधील मंदिरात पहाटे 4.30 वाजता भाविकांनी आरती व दर्शनासाठी गर्दी केली होती.श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शोड्षोपचार पुजा करून, मंगल आरती, तुलसी आरती, चैतन्य शिक्षा अष्टकम होऊन सर्वांकडून 16 माळा जप करून घेण्यात आला.यावेळी प्रभुजींनी आषाढी एकादशीचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच येत्या 28 जुलै रोजी येथील शारदा मंगल कार्यालयात होणार्या श्रीमद् भागवत कथेसाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आषाढी एकादशीच्यानिमित्ताने कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेची विठ्ठल-रक्मिणी मातेच्या वेशभूषेत नित्योपचार पूजा बांधण्यात आली होती.पहाटेपासूनच देवी दर्शनार्थ हजारों भाविकांची गर्दी उसळली होती.