Tuljapur : तुळजाभवानी देवीची आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा

तुळजाभवानी देवीची आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा
Tuljabhavani Temple
तुळजाभवानी देवीची आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजाpudhari photo
Published on
Updated on

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी (दि. १०) रोजी आठव्या माळेच्या दिवशी श्री. तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.

श्री. तुळजाभवानी देवीच्या नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिल्याची आख्यायिका आहे. म्हणून या दिवशी देवीला महाअलंकार घालण्यात येऊन भवानी तलवार अवतार पूजा मांडण्यात येते.

दरम्यान, बुधवारी (दि. ९) रोजी रात्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक गरुड वाहनावरुन काढण्यात आली. तर शुक्रवारी (दि. ११) रोजी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता होम व हवनास प्रारंभ होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता पुर्णाहुती देण्यात येणार आहे.

Tuljabhavani Temple
TuljaBhavani Devi : सातव्या माळेला तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news