Accident at Mohol on Solapur-Pune highway
सोलापूर - पुणे महामार्गावरील मोहोळ येथे झालेल्या अपघातात दोन कारचे मोठे नुकसान झाले.   Pudhari News Network
सोलापूर

सोलापूर: मोहोळ येथे दोन कारची धडक: १ जण ठार

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा : मोहोळ शहरातील तरुणांनी व पोलीस प्रशासनाने काचा फोडून, दरवाजा तोडत कारमधील जखमीला बाहेर काढून उपचाराला पाठवले. पण दुर्दैवाने जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोलापूर - पुणे महामार्गावर मोहोळ शहरालगत नागनाथ विद्यालयाच्या समोरील उड्डाणपुलावर सोमवारी (दि.२४) घडली. राजेश बाळकृष्ण सुपेकर असे अपघातातील मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच.१३, सी. एस.१८७४) ही कार घेऊन चालकासह राजेश सुपेकर (वय ४५, रा. जुळे, सोलापूर) हे सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघाले होते. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान त्यांची कार मोहोळ शहरालगत असलेल्या नागनाथ विद्यालयासमोरील उड्डाणपुलावर आली असता अचानक तांत्रिक कारणाने ती कार रस्ता दुभाजक ओलांडून भरधाव वेगात पुणे ते सोलापूर महामार्गावर गेली.

त्याच दरम्यान पुण्याकडून येणाऱ्या एसयुव्ही कार (एमएच १४, एल.जे. ९२६४) ची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कार मधील कोणालाही सुदैवाने काही झाले नाही, तर बलेनो कार मधील चालक किरकोळ जखमी झाला. तर दुसऱ्या सीटवर बसलेले राजेश सुपेकर हे गंभीर जखमी होऊन कारमध्येच अडकले होते. अपघाताची माहिती होताच मोहोळ शहरातील तरुणांनी तसेच पोलीस प्रशासनाने, सावळेश्वर टोल नाका पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

वेगवेगळ्या बाजूंनी प्रयत्न करून कारच्या काचा फोडून दरवाजा तोडून जखमीला तात्काळ बाहेर काढत सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान राजेश सुपेकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

बघ्यांची गर्दी अन् जखमीची तळमळ...

दोन कारच्या झालेल्या या अपघातामध्ये एक जण कार मध्येच गंभीररित्या जखमी होऊन अडकला होता. त्या जखमीला बाहेर काढून उपचारासाठी मदत करण्याऐवजी इतर वाहनचालक मोबाईल मध्ये शूटिंग काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मोहोळ शहरातील तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारच्या काचा फोडल्या. दरवाजा वाकवला आणि जखमीला बाहेर काढत रुग्णवाहिकेपर्यंत नेले. अपघातानंतर दोन्ही बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताचा तपास अपघात पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार करीत आहेत.

SCROLL FOR NEXT