सोलापूर : तांब्याची तार चोरून विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

संशयित आरोपींसह करमाळा पोलिसांचे पथक
संशयित आरोपींसह करमाळा पोलिसांचे पथक
  • करमाळा (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा – विविध विजेवरील मोटारीचे दुकाने फोडून तसेच शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारीतील तांब्याच्या तारा चोरून रातोरात विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करमाळा तालुक्यासह सोलापूर, पुणे, अहमदनगर, धाराशिव आदी जिल्ह्यात विविध ठिकाणी या टोळीने चोरी केली होती. करमाळ्याच्या गोपनीय विभागाच्या पोलिसांनी तिघांना सापळा रचत अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना करमाळा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती कुलकर्णी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील पश्चिम विभागामध्ये मौजे दिवेगव्हाण येथे जगदंबा मोटार रिवायडींग वर्कशॉप या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून ९जून रोजी दुकानात प्रवेश करून त्या दुकानातील सबमर्सिबल मोटारीचे कॉपर केबल बंडल, लहान कॉपर बंडल एकूण १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी दिवेगव्हाण येथील हरी बबन पाटोळे (वय २६ रा. दिवेगव्हाण) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केला होता. फिर्याद दाखल होताच करमाळा पोलिसांचे पथक उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली सतर्क झाले. हवालदार अजित उबाळे, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी, तौफिक काझी, सोमनाथ जगताप, ज्ञानेश्वर घोंगडे, रविराज गटकुळ, गणेश शिंदे, सायबर सेलचे व्यंकटेश मोरे आदींनी याबाबत कौशल्यपूर्ण तपास केला.

अधिक वाचा –

कंदर तालुका करमाळा येथे पोलीस संशयित आरोपीच्या मागावर असताना एक संशयित आरोपी ईश्वरी हॉटेल परिसरात पाठीवर बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळून आला. यावेळी त्याच्याकडे विचारपूस केले असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याची बॅग तपासून पाहिले असता त्यामध्ये दोन स्क्रू ड्रायव्हर, कटर, कटावणी आदी घरफोडी करण्यास व दुकानाचे शटर उचकटण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य सापडले.

याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता बारामती, दौंड, औरंगाबाद आदी ठिकाणच्या संशयित गुन्हेगारांना साथीत घेऊन तो मागील काही महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात, इंदापूर तसेच पुणे जिल्ह्यात आदी ठिकाणी जाऊन कॉपर वायरचे दुकानाचे शटर व कुलपे तोडून कॉपर वायरचे केबल बंडल, कॉपर वायर आदि साहित्याची चोरी करत होते.

अधिक वाचा –

चोरलेला माल सोमनाथ शांतप्पा कोगनूर (रा. शेवाळे प्लॉट, कुरकुंभ ता. दौंड) यांना देत होते. करमाळा पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ४७२ किलो वजनाचे तांब्याची तार असे ४ लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून यातील तिघा संशयित आरोपींना करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अधिक वाचा –

मिराज उर्फ सैफन, शिवाजी काळे (वय २५, वायरलेस फाटा, दौंड जिल्हा पुणे), ऋषिकेश शरद भोसले (रा. कोराळे, तालुका बारामती जिल्हा पुणे), सोमनाथ शांताप्पा (शेवाळे प्लॉट, कुरकुंभ ता. दौंड जिल्हा पुणे) यांना बेड्या ठोकल्या. करमाळा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. करमाळा पोलीस ठाण्यामध्ये या संशयितांविरोधात या वर्षात चार गुन्हे दाखल आहेत.
या पकडलेल्या संशयित आरोपींकडून तीन घरे व एक चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकारांना दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news