सोलापूरची टीम जाणार म्हैसूर, भुवनेश्वर, इंदूरला  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Team Visit | सोलापूरची टीम जाणार म्हैसूर, भुवनेश्वर, इंदूरला

आयटी पार्कविषयी 20 तारखेला बैठक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : येथील संभाव्य आयटी पार्कसाठी काय धोरण असावे याबाबत अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय पथक या आठवड्यात मैसूर, भुवनेश्वर, इंदूरला जाणार आहे. त्यानंतर आयटी पार्कसाठी सर्वोत्तम धोरण ठरवण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

आयटी पार्कसाठी हिरज, कोंडी, कुंभारी, एन जी मिल, होटगी येथील जागांची पाहणी झाली आहे. यातील एक जागा निश्चितीसाठी 20 सप्टेंबर रोजी बैठक होणार असून, 30 सप्टेंबर रोजी जागेविषयी अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

दोन जागा अन् अडचणीही

होटगीनजीक सिद्धेश्वर कारखानालगत 60 एकर जागेचा पर्याय आहे. परंतु या जागेवर 30 ते 38 मीटरपेक्षा जास्त उंच बांधकाम केल्यास विमान लँडिंगला अडचण येऊ शकते. एनजी मिलची जागा 30 एकर असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमानुसार याठिकाणी केवळ 60 टक्के जागेवर बांधकाम करता येते. त्यामुळे 15 एकरावर आयटी पार्क सुरू करण्यावर मर्यादा आहे.

आयटी पार्कसाठी या सुविधा आवश्यक

आयटी पार्कसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ असणे आवश्यक. मात्र सध्या ते सोलापुरात नाही.

निदान दिल्ली, मुंबई, बंगळूर या शहराशी निगडित सुरळीत विमानसेवेची सोलापुरातून कनेक्टिव्हिटी हवी.

आयटी पार्कसाठी किमान 50 एकर जागा, शिक्षण आणि मेडिकल सुविधाही आवश्यक.

बहुतांश आयटी कंपन्या या परदेशी आहेत. या परदेशी कंपन्यांना कमीत कमी वेळेत अधिक सुविधा हव्या असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT