

सांगोला : सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांच्या टीमने सोनंद (ता. सांगोला) येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून 52 पत्याचा पैशाची पैज लावून जुगार खेळत असणार्या 50 जणांकडून रोख रकमेसह मोबाईल, जुगार साहित्य, 52 पानी पत्याचे डाव, मोटारसायकल चारचाकी वाहने, देशी-विदेशी दारू असा दोन कोटी अडुसष्ठ लाख बाहत्तर हजार एकशे पच्याम्नव रुपये मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रथमच कारवाई झाल्याने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांना मौजे सोनंद ता. सांगोला नि. सोलापूर येथे हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्राचे खोलीत सचिन साहेबराव काशिद (रा. सोनंद, ता. सांगोला) व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ (रा. आथणी, जि. बेळगाव) हे विनापरवाना जुगार क्लब चालवित आहेत, अशी बातमी मिळाली होती. सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई करणेबाबत आदेशीत करण्यात आलेले होते.
त्याप्रमाणे पोलीस ठाणेस 29 रोजी सहा. पोलीस अधिक्षक सह 4 पोलीस पथकाचे सोबत सोनंद येथे जावून मटन भाकरी हॉटेलवर छापा कारवाई केली. याबाबत सांगोला पोलीस ठाणेस वरील 50 इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा 1887 कलम 4,5 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत गडळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली मसपोनि विभावरी रेळेकर, पोसई भारत भोसले व टीमने केली आहे.