सोलापूर

सोलापूर : बाल दिंडीला जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून मुलाने जीवन संपवले

निलेश पोतदार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा बाल दिंडीला जाण्यासाठी पित्याने दुचाकी दिली नाही, म्हणून रागाच्या भरात एका (१४ वर्षीय) मुलाने साडीने जांभळाच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेनंतर सांगोला तालुक्यात सर्वसामान्यांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यश राजेंद्र काळे (वय १४, रा. गुणापवाडी, ता. सांगोला) असे जीवन संपवलेल्‍या मुलाचे नाव आहे. गुरुवार, २९ जून २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यात गुणापवाडी येथे ही घटना घडली.

याबाबत पांडुरंग विठोबा वाघमोडे (रा.गुणापवाडी, ता. सांगोला) यांनी पोलिसात खबर दिली. यश काळे हा (रा. बेवनूर, ता. जत) येथील एका हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकत होता. गुरुवार, २९ जून रोजी त्याच्या हायस्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली होती. या दिंडीला जाण्यासाठी त्याने वडिलांकडे दुचाकी मागितली. त्यावेळी वडिलांनी त्यास मला पंढरपूर वारीला जायचे आहे म्हणत मोटरसायकल देण्यास नकार दिला.

त्यानंतर वडील पंढरपुरला निघून गेले अन यशने रागाच्या भरात घराच्या पाठीमागे डोंगराच्या पायथ्याशी जाऊन जांभळीच्या झाडाच्या फांद्यीला साडीने गळफास घेतला. दरम्यान त्या परिसरातील मेंढपाळांना तो झाडाच्या फांदील लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी यशच्या घरी आईशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला दुचाकीवरून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वी मृत पावल्याचे घोषीत केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT