सोलापूर

सोलापूर : लज्जास्पद कृत्य केल्याने बहिणीची सावत्र भावासह पाच जणांविरोधात तक्रार; गुन्हा दाखल

backup backup

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : घरी येऊन शिवीगाळ करत अल्पवयीन बहिणीला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी सावत्र भावांसह पाच जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पीडित मुलीच्या वडिलांना दोन पत्नी आहेत. पीडितेच्या आईच्या नावाने जागा असून ती जागा दुसऱ्या पत्नीच्या मुलांच्या नावावर करण्यासाठी वडील हे पीडितेच्या आईला मारहाण करत त्रास देत होते.

अशाच प्रकारे ३१ जुलै रोजी रात्री पीडितेचे वडील व दोन सावत्र भाऊ आणि दुसऱ्या आईचे नातेवाईक हे घरी येऊन पीडितेच्या आईला शिवीगाळ करत मारहाण करू लागले. यामुळे मध्यस्थी करताना पीडितेला आरोपींनी लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच केस केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून पीडितेचे वडील,सावत्र भाऊ व नातेवाईकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT