Beijing records heaviest rainfall : चीनची राजधानी ‘पाण्यात’ : १४४ वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस; २१ ठार, हजारो विस्थापित

Beijing records heaviest rainfall
Beijing records heaviest rainfall
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनची राजधीनी बिजींग येथे पाऊसाने जोरदार हजेरी लावली आहे. बिजींगमध्ये शनिवार आणि बुधवारच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हा गेल्या १४४ वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, पूरस्थितीमुळे २१ लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर अजूनही बचावकार्य सुरुच आहे. पावसामुळे चीनची राजधानी बिजींग पाण्याखाली गेली आहे. शिवाय, हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. (Beijing records heaviest rainfall)

गेल्या २४ तासांत ओकिनावामध्ये अनेक ठिकाणी १७५ ते २२० मिलिमीटर पाऊस पडला. ओकिनावा इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या म्हणण्यानुसार, सरकारने रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले. बुधवारी सकाळी जोरदार वाऱ्याने वीज तारा तुटल्या, त्यामुळे अनेक घरांमधील विद्युत सेवा बंद करण्यात आली आहे. (Beijing records heaviest rainfall)

बिजींगमधील पूरस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू

चीनची राजधानी बीजिंगच्या आसपासच्या भागात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात किमान २१ लोकांचा मृत्यू झाला असून २६ जण बेपत्ता आहेत. सरकारी माध्यमांनी मंगळवारी ही बातमी दिली. अतिवृष्टीमुळे रेल्वे स्थानके बंद करावी लागली आहेत. शिवाय, पुराच्या पाणी लोकांच्या घरात शिरले रस्ते वाहून गेले आहेत. (Beijing records heaviest rainfall)

१९९८ मध्येही महापुराने केला होता कहर

बीजिंगमधील हवामान मध्यम पावसासह कोरडे असते. चीनच्या इतर भागांमध्ये क्वचितच असा जोरदार पाऊस पडतो. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी "संपूर्ण शक्ती" वापरण्याचे आदेश जारी केले. चीनमधील अलीकडच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी पूर १९९८ मध्ये आला होता. त्यावेळी ४१५० लोकांचा मृत्यू झाला होता. (Beijing records heaviest rainfall)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news