कोल्हापूर : वनरक्षक परिक्षेत मोबाईलचा वापर! दीड तासांनंतर परिक्षार्थींकडून प्रकरण उघडकीस

कोल्हापूर : वनरक्षक परिक्षेत मोबाईलचा वापर! दीड तासांनंतर परिक्षार्थींकडून प्रकरण उघडकीस
Published on
Updated on

 :
पुढारी वृत्तसेवा : वनरक्षक परिक्षेच्या कोल्हापूरातील येथील शिये येथील केंद्रावर आज एक विद्यार्थी मोबाईलचा वापर करुन उत्तरे देत असल्याचा प्रकार उघडकीस आला. शिये येथील टिसीएस आयऑन डिजीटल झोन (ता. करवीर) या परिक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले. हा सर्व प्रकार इतर परिक्षार्थीनी सुपरवायझरच्या निदर्शनास आणून दिला. घटनास्थळी शिरोली पोलिसांनी धाव घेवून संबंधित विद्यार्थ्यास ताब्यात घेतले.

शिये येथील टीसीएस आयऑन डिजीटल झोन या परिक्षा केंद्रावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो विद्यार्थ्यी आपले भविष्य घडवण्यासाठी विविध पदाच्या परिक्षा देण्यास येत असतात. आज (दि. ३) वन निरीक्षक पदाचा पेपर असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेस केंद्रावर आले होते. या सर्वांची अंगझडती घेवुन सोडण्यात आले होते. पण तरीही छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या गणेश रतन नागलोट (वय २३) हा उमेदवार मोबाईलचा पेपर करुन सोडवत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे हे प्रकरण तब्बल  दिड तासांनंतर निदर्शनास आले. हा उमेदवार इतर कोणाला तरी फोन करून प्रश्नाची उत्तरे विचारून घेत होता की, नेटवरून उत्तरे शोधत होता याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. परिक्षा सुपरवायझर यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलिसांना पाचारण करुन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पण या प्रकारामुळे अधिकारी, सुपरवायझर सामील होते का याची चौकशी पोलीस करत आहेत.

सर्व तपासणी करुन देखील परिक्षार्थीकडे मोबाईल कसा आला?

परिक्षा केंद्रावर परिक्षेसाठी आत जाताना विद्यार्थ्याला चप्पल , बूट अन्य साहीत्य बाहेर काढून जावे लागते मग त्या विद्यार्थ्याजवळ मोबाईल फोन सापडतो. याचा अर्थ परिक्षा अधिकारी यामध्ये सामील असल्याचा संशय परिक्षार्थी कडून व्यक्त होत आहे. केंद्रावर पालक व परिक्षार्थींनी घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारल्याने काही काळ गोंधळ उडाला.

रोज १६-१६ तास अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न पहाणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांनी विविध पदाच्या कित्येक परिक्षा दिल्या आहेत. पण आज (दि. ३) घडलेल्या घटनेवरून यामध्ये सरकारी अधिकारी, आयऑन डिजीटल झोनशी संबंधित व्यक्ती तसेच इतरही काही लोक सामील असल्याचा पालकांचा आरोप आहे. एका एका जागेसाठी दिवस रात्र अभ्यास करून विद्यार्थ्याना निराशाच पदरात पडत आहे. विविध पदासाठी जाहिराती काढून त्यातून लाखो फी गोळा करून पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news