सोलापूर

सोलापूर : जालन्यातील लाठीमारच्या निषेधार्थ पटवर्धन कुरोलीत गाव बंदची हाक

मोहन कारंडे

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील पटवर्धन कुरोली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गाव बंद करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी गणेश जाधव, सागर नाईकनवरे, महावीर नाईकनवरे, राहुल नाईकनवरे, प्रताप चंदनकर, माऊली जवळेकर, सत्यजित मोरे, कल्याण मगर, अशोक नाईकनवरे, राहुल उपासे, विकास उपासे, सागर चव्हाण, सिध्देश्वर नाईकनवरे, समाधान नाईकनवरे, गोपाळ पाटील यांच्यासह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

जालन्यातील अंतरावली येथील घटनेत मनोज जरांगे पाटील शांततेच्या मार्गाने बेमुदत आमरण उपोषण करत असताना आंदोलन उधळून लावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. प्रचंड मोठा फौजफाटा घेऊन पोलिसांनी महिला, लहान मुले, वृद्ध व तरुणांवर लाठी हल्ला व गोळीबार केला. जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या मराठा समाजावर हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला एक वेगळा मार्ग मिळाला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT