आंदोलकांवर लाठीमार, गोळीबार ही गंभीर बाब : शरद पवार | पुढारी

आंदोलकांवर लाठीमार, गोळीबार ही गंभीर बाब : शरद पवार

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे मराठा आंदोलकांशी चर्चा केली आणि दुसरीकडे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार, गोळीबार केला. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नव्हता, त्यामुळे बळाचा वापर करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

शनिवारी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय जाधव, आ. राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, बीडचे आ. संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

पवार म्हणाले, आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक आणली गेली. लाठीमार व गोळीबाराची घटना गंभीर व दुर्दैवी आहे.. मराठा आरक्षण आंदोलन शांततेने सुरू ठेवले पाहिजे. राज्य सरकारकडून आंदोलकांना चुकीची वागणूक देण्यात आली. स्त्री-पुरुष न पाहता आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला.

 

 

 

Back to top button