मोहोळ : तालुक्यातील आष्टे गावात रात्री झालेल्या जोरदार वारे व पावसामुळे शेतकरी कल्याण शेंडगे यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने घरातील धान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे भिजून खराब झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे शेंडगे कुटुंबीयांवर अक्षरशः उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा आलेल्या वादळी पावसात घराचे मोठे नुकसान झाले. घरावरील पत्रे उडाल्याने संपूर्ण . यामध्ये धान्य, कपडे तसेच घरातील आवश्यक साहित्य वा त्याने उडून गेले धान्य किराणा खराब झाले. सध्या या कुटुंबाकडे राहण्यासाठी सुरक्षित घर नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, शेंडगे यांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले होते. मात्र, काही कारणांमुळे घर बांधू दिले नसल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मंजूर घरकुल असूनही आज त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेनंतर पंचनामा करून तातडीची आर्थिक मदत द्यावी, तसेच मंजूर घरकुलाचे बांधकाम त्वरित सुरू करून तरी मला शासनाकडू नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.