Court Verdict pudhari photo
सोलापूर

Solapur Court Verdict | मोहोळ खून प्रकरण: दोघांना जन्मठेप; प्रत्येकी १० हजारांचा दंड

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा

पुढारी वृत्तसेवा

Mohol Crime News

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील खून प्रकरणात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. ६) महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. रंजना दादासाहेब पवार (रा. वडाची वाडी, ता. मोहोळ) आणि अमोल ऊर्फ कृष्णा अंगद पांढरे (रा. कोण्हेरी, ता. मोहोळ) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८८/२०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२०, १२० (ब) आणि ३४ अंतर्गत दाखल झालेल्या या प्रकरणाची सुनावणी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सेशन केस क्रमांक २९९/२०२३ अन्वये सुरू होती.

जिल्हा न्यायाधीश आर. एन. शिंदे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

तपास आणि न्यायालयीन कामकाजात पोलिसांचे योगदान

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एपीआय खर्गे यांनी केला. तर आकस्मिक मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जिवराज कासवीद (बक्कल क्रमांक ३०३) यांनी केला.

सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील आनंद कुर्डूकर, प्रदीपसिंग राजपूत आणि माधुरी देशपांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. सोलापूर तालुका विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खटल्याचे न्यायालयीन कामकाज पार पडले.

या खटल्याच्या कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी जीपीएसआय विजयकुमार जाधव, जीपीएसआय प्रियवंदना जाधव तसेच मोहोळचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. डी. भोसले (१४१४), पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार (१८९६), महिला पोलीस कॉन्स्टेबल रेशमा लांडे (५६४) आणि पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला (५७९) यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT