Solapur 
सोलापूर

Solapur | मोहोळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीवर अखेर प्रशासकराज!

Solapur | फक्त कारभारी बदलले मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार शासकीय अधिकाऱ्यांकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जैन यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ शहर - मोहोळ तालुक्यातील मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या एकूण ७३ ग्रामपंचायतींवर आता शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) कुलदीप जैन यांनी जारी केले आहेत.

मुदत संपलेल्या मोहोळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका तत्काळ होणे गरजेचे असताना त्या लांबणीवर पडल्या आहेत. या ग्रामपंचायतीवर ८ सप्टेंबर २०२६ च्या आदेशान्वये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जैन यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज रखडू नये व ते सुरळीत चालावे म्हणून जोपर्यंत या ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडणुका होत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी प्रशासकाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर प्रशासक कोण होणार, याकडे गाव पातळीपासून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. प्रशासक पदावरुन स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या हालचालींनाही आता पूर्णविराम मिळाला आहे. प्रशासनाने स्थानिक राजकीय व्यक्तीऐवजी शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने ग्रामपंचायतींवर थेट प्रशासकीय नियंत्रण आले आहे. प्रशासक नेमणुकीबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले असून त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती व त्या ठिकाणी नेमलेले प्रशासक पुढील प्रमाणे आहेत.

सौदणे, कुरूल, पेनूर, चिंचोलीकाटी, घोडेश्वर, अंकोली, कोरवली, वरकुटे, औंढी, परमेश्वर पिंपरी, पिरटाकळी, ढोकबाबुळगाव, पाटकुल, आष्टी, शेटफळ,( नागसेन कांबळे, विस्तार अधिकारी पंचायत समिती),

भोयरे, नरखेड, पापरी, देवडी, खंडाळी, पोखरापूर, देगांव, कोळेगांव, भांबेवाडी, यल्लमवाडी, मसलेचौधरी,(एस.आर. ठक्क, विस्तार अधिकारी)

चिखली, हिवरे, बिटले, गलंदवाडी/ पासलेवाडी, सिध्देवाडी, वडाचीवाडी, बोपले, एकुरके, कामती खुर्द,( गजानन मारडकर, विस्तार अधिकारी)

घाटणे, वडवळ, आष्टे, मुंढेवाडी, पोफळी, हिंगणी नि, लांबोटी, सय्यद वरवडे, सावळेश्वर (प्रतापसिंह शेजाळ,विस्तार अधिकारी कृषी).

तेलंगवाडी, ( नागसेन कांबळे विस्तार अधिकारी).

आढेगाव, विरवडे बु, वाळूज, मनगोळी/ भैरववाडी, नजिकपिंपरी,( श्री बनसोडे विस्तार अधिकारी सांख्यिकी)

येवती, खवणी, शेजबाबुळगांव, तांबोळे, येणकी, कोथाळे,(नितीन चव्हाण कृषी अधिकारी)

टाकळी सिकंदर, मिरी, वटवटे, इंचगांव, वाघोली/ वाघोलीवाडी, राम हिंगणी, अर्जुनसोंड, विरवडे खुर्द,( बंडू महादेव शिंदे विस्तार अधिकारी शिक्षण)

शिरापूर मो, कातेवाडी, शिरापूर सो, दादपूर, हराळवाडी, जामगांव बु , शिंगोली/ तरटगांव , नांदगाव,(अमोल वाघमारे, विस्तार अधिकारी कृषी)

कोन्हेरी ( गजानन मारडकर, ठक्का एस.आर विस्तार अधिकारी)

आदींची ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती मोहोळ पंचायत समिती मधून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT