ST Bus Service : पुणे मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढवल्या

खासगी ट्रॅव्हल्सना अच्छेदिन; ‘सिद्धेश्वर’सह ‘हुतात्मा एक्स्प्रेस’चीही फेरी केली रद्द
ST Bus
ST Buspudhari photo
Published on
Updated on

सोलापूर : हडपसर-घोरपडी या दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यामुळे ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे सोलापूरवरून व मार्गावरून धावणाऱ्या काही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडली आहे. शिवाय, सिध्देश्वर व हुतात्माही रद्द केली आहे. यामुळे, सोलापूरकरांना एसटी बस शिवाय प्रवास करता येणार नाही. सोलापूरकरांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी महामंडळाने अतिरिक्त दहा बसेस पुणे मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने घेतलेल्या ब्लॉक अनेक गाड्या रद्द करून काहींचे मार्गात बदल केला तर काही गाड्या शॉर्टटर्मिनेट केला आहे. येथून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यांना पर्यायी प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालय प्रशासनाकडून अतिरिक्त दहा एसटी बसेस या मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाचा खासगी रिक्षांसह अन्य प्रवासी वाहतुकीलाही फटका बसला असून कॅब आणि ट्रॅव्हल्सनाही अच्छे दिन येतील.

रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकभुळे खासगी कॅबसह ट्रॅव्हल्सलाही अच्छे दिन आलेले आहेत. यांचेही फेऱ्यां वाढणार आहेत. प्रवाशांकडून खासगी वाहनांचा पर्याय निवडला जात आहे. म्हणूनच, सध्या कॅब, ट्रॅव्हल्स व खासगी बससेवांकडेही प्रवाशांचे कल वाढला आहे. यामुळे, सध्या या खासगी वाहन मालकांना अच्छेदिन आले आहेत.

अतिरिक्त बस सोडल्या

पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या यांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. नियमित प्रवाशांसह नोकरी, शिक्षण, व्यवसाय व अन्य कामानिमित्त नेहमीच जातात. सध्या, प्रवाशांना एसटीने प्रवास करावे लागत आहे. म्हणूनच मध्यवर्ती बस स्थानकातून पुणे मार्गावर अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत.

रेल्वेचे वेळापत्रक काही दिवस कोलमडलेली आहे. यामुळे, शहर जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातून वाढीव १० बसेस सोडल्याचा निर्णय घेतला आहे.
- अमोल गोंजारी, विभागीय नियंत्रक, परिवहन महामंडळ, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news