सोलापूर

सोलापूर : भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक, आजी अन् नातवाचा मृत्यू

backup backup

महूद, पुढारी वृत्तसेवा : परगावी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. यामध्ये आजी आणि नातवाच्या मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले आहेत. द्रोपदा शिवाजी आटपाडकर(वय ५०) व सिद्धेश्वर नामदेव काळेल (वय ५) असे अपघातात मृत्यू झालेल्या आजी आणि नातवाचे नाव आहे. तर नामदेव काळेल व त्यांची पत्नी रुक्मिणी काळेल हे गंभीर जखमी झाले आहेत

शेरेवाडी येथे एकाच दिशेने दिघंचीकडे निघालेल्या दोन वाहना पैकी पुढील वाहनाची गती अचानक कमी झाल्याने मागून जाणारी भरधाव कार पुढील वाहनास धडकून उजव्या बाजूला उभ्या असलेल्या चौघांना ठोकरून  थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसली. या  मार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना अशी अवस्था झाली आहे.

रविवार(ता.२६) रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास महूद-दिघंची मार्गावरील कटफळ अंतर्गत असलेल्या शेरेवाडी येथे हा अपघात झाला आहे. आटपाडकरवस्ती(कटफळ) येथे राहणारे नामदेव सदाशिव काळेल,त्यांची पत्नी रुक्मिणी काळेल,मुलगा सिद्धेश्वर काळेल व सासुबाई द्रोपदा शिवाजी आटपाडकर हे चौघेजण वसईकडे जाण्यासाठी शेरेवाडी चौकातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानासमोर ट्रॅव्हल बसची वाट पाहत उभे होते. त्यावेळी मालवाहतूक करणारे पिकअप व त्याच्या नेक्साॅन चार चाकी गाडी वेगाने दिघंची कडे निघाले होते. शेरेवाडी पार्टीी येथे ही दोन्ही वाहने आलीी असता पुढील पिकअप चा वेग अचानक कमी झाला.त्यामुळे मागील  नेक्साॅन गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने या गाडीने पिकअपला  धडक दिली आणि रस्त्याकडेला दुकानासमोर उभ्या असलेल् चौघांना ठोकून ही गाडी भिंत पाडून दुकानात घुसली.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT