शिवसेनेतील बंडाळी कोणाच्या पथ्यावर?  (Pudhari File Photo)
सोलापूर

Shiv Sena Rebellion | शिवसेनेतील बंडाळी कोणाच्या पथ्यावर?

Shinde Faction Expectations | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित लक्ष देण्याची कार्यकर्त्यांची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर सोलापूर जिल्ह्यात मोठी बंडाळी माजली आहे. राजीनाम्याचे लोण सर्वत्र पसरत आहे. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले शहरात बंडाची ठिणगी टाकली आहे. जवळपास तीन पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. सर्वांचा रोष लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यावर आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील बंडाळी शिवसेनेने डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंडोबाना लवकर थंड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना सोलापूर शहर व जिल्ह्यातील पक्षाची संघटनात्मक ताकद वाढत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तर जिल्ह्यातील अनेक मोठे नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिंदे सेनेचा मोठा विस्तार होता आहे. अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, उत्तमप्रकाश खंदारे, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, दक्षिणचे अमर पाटील, पंढरपूरचे साईनाथ अभंगराव आदी दिग्गज मंडळींनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. यासाठी शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी पुढाकार घेतला होता. त्यात त्यांना यशही आले. यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची जिल्हयातील ताकद वाढली.

एकीकडे शिवसेनेत इतर पक्षामधून आवक होत असताना दुसरीकडे गळती चालू असल्याचे वास्तव आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत अशीच स्थिती राहिली तर शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेवर नाराज असलेल्या मंडळीचा भाजपाशी घरोबा वाढला आहे. आतापर्यंत दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले, युवासेनेचे समर्थ मोटे यांच्यासह तीस पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिला आहे. पक्ष सोडणार्‍या सर्व पदाधिकार्‍यांचा महेश साठे यांच्यावर रोष आहे. येणार्‍या महानगरपालिका निवडणुकीत याचा मोठा फटका सोलापुरात शिवसेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

साठेच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेची वाताहत झाल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पातळीवर कल्पना देऊन ही कारवाई झाली नाही. तर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, उत्तमप्रकाश खंदारे, अमर पाटील, साईनाथ अभंगराव यांना पक्षात घेऊन पक्षाने नेमके काय दिले? असा सवाल उपस्थित केला आहे. आपण समन्वयक म्हणून आपल्याला विचाना देखिल केली नाही, अशा पक्षात पदावर राऊन काय उपयोग असा आरोप करत कोल्हे यांनी शिवसेनेला घरचा अहेर दिला आहे. पक्षात मोठ्या प्रमाणावर खदखद निर्माण झाली असताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राज्य प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे.

कोल्हेच्या ‘राधाश्री’ निवास्थानीच्या फेर्‍या वाढल्या

माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुुरारजी पेठेतील राधाश्री निवास्थानी कोल्हे यांच्या फेर्‍या वाढल्या आहे. त्यामुळे कोल्हे भाजपाच्या वाटेवर आहेत, असे बोलेले जात आहे. पण कोल्हे भाजपला पचनी पडतील का हेही पहावे लागणार आहे. भाजपची शिस्त दिलीपभाऊंना मानवणारी नाही. भाऊना अ‍ॅडजेस्टमेंट घ्यावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT