election  
सोलापूर

Solapur Samarth Bank Election|समर्थ बँकेवर 'सहकार'ची सत्ता

Samarth Bank election Sahkar panel- समर्थ बँक बचाव व विकास पॅनेलचा धुव्वा, एकही जागा नाही

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार परिवार पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. विरोधातील समर्थ बँक बचाव व विकास पॅनेलचा धुव्वा उडाला असून त्यांच्या पदरात एकही जागा पडली नाही.

विजयानंतर विजयी उमेदवारांसह सहकार परिवार पॅनल प्रमुख आणि समर्थकांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांवर गुलाबाच्या फुलांची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. रविवारी ४ हजार २७७मतदारांपैकी एकूण १ हजार २१९ जणांनी मतदान केले होते. सोमवारी डफरीन चौकातील सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. यापैकी मतमोजणीत १ हजार २५९ मते वैध ठरली, तर ४० मते अवैध घोषित करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी निकाल जाहीर केला. सहकार परिवार पॅनलचे सर्वसाधारण गटातील १० तर महिला राखीव गटातील दोन असे सर्व उमेदवार बहुमत घेत विजयी झाले. इतर मागास प्रवर्गात रवींद्र गारुडकर, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात महानंद कांबळे आणि भटक्या जाती व विमुक्त प्रवर्गात प्रकाश बंडगर हे सहकार परिवार पॅनलचे तीन उमेदवार याआधीच बिनविरोध झाले होते.

उर्वरित सर्वसाधारण मतदारसंघातील १० जागा व महिला राखीव प्रवर्गातील २ जागा अशा एकूण १२ जागांसाठी ही निवडणूक झाली. समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सर्व १५ जागांवरही सहकार परिवार पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. आता येत्या १५ दिवसात चेअरमनही निवड होऊ शकते. मात्र नवीन चेअरमन आणि संचालक मंडळासमोर आरबीआयचे निर्बंध उठवून समर्थ सहकारी बँकेला आर्थिक उभारी देण्याचे आव्हान असेल. ज्या दिवशी बँकेचा कारभार सुरू होईल, त्या दिवशी आमचे १५ संचालक सत्कार स्वीकारतील असे सहकार परिवारचे पॅनल प्रमुख राकेश टोळ्ये यांनी सांगितले.

विजयी उमेदवार व मिळालेली मते-

सिंग ओमप्रकाश - ११५४

सिंग दिव्यांशू- ११४०

सिंग राहुल - ११३८

चौधरी स्वरूप - ११३८

कामतकर अमित - १०८६

माने युवराज- १०४८

बागेवाडीकर प्रशांत - १०९३

खाडिलकर मुरलीधर - १०७६

दुंलगे दिलीप - १०५३

करकमकर किरण - १०१२

सिंग मालती - १११०

इनामदार सुजाता १०८८

बंडगर प्रकाश बिनविरोध

कांबळे महानंद - बिनविरोध

गारुडकर रविंद्र - बिनविरोध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT