

सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज, शुक्रवारी (दि. ९) व उद्या शनिवारी (दि.१०) असे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे.
केंद्रीय पथकाच्या या पाहणीनंतर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. या केंद्रीय पथकात पीकविषयक तज्ज्ञ डॉ. के. पन्नुस्वामी, पाणीपुरवठा विभागाचे संचालक अब्बास खान, अन्न विभागाचे संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. या पथकाकडून गोशाळेचाही पाहणी केली जाणार आहे.
पथकाचा दौरा असा
l कर्जत (अहिल्यानगर) येथून आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे पथक करमाळ्यात दाखल होईल.
l बार्शी, उत्तर सोलापूर तालुक्यातील पीक पाहणी करून पथकाचे सदस्य सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पीक परिस्थिती, टंचाईचा आढावा घेतील.
l शनिवारी (दि. १०) सकाळी प्रतापनगर मार्गे दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यांतील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी पथक करेल.