सोलापूर

चंद्रदर्शन झाल्यानंतरच रमजान ईद साजरी होणार

दिनेश चोरगे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदसाठी मंगळवार ९ एप्रिलला चंद्रदर्शन झाल्यास बुधवारी १० एप्रिलला रमजान ईद साजरी होईल. जर चंद्रदर्शन न झाल्यास ३० वा उपवास (रोजा) पूर्ण होईल आणि गुरुवार दि.११ एप्रिल रोजी रमजान ईद होईल, अशी माहिती सोलापूरचे शहर काझी सय्यद अहमदअली निजामी यांनी दिली.

मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजानचा महिना सुरू आहे. मुस्लिम बांधवांचा उपवास (रोजा) सुरू आहे. दरम्यान शेवटचे चार ते पाच उपवास राहिले आहेत. त्यामुळे शहरात रमजान ईदची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. सोलापूरचे शहर काजी अमजद अली यांनी ९ एप्रिल रोजी चंद्रदर्शन पाहण्यासाठी आवाहन केले आहे. जर चंद्र दर्शन न झाल्यास ३० रोजे पूर्ण करून गुरुवार ११ एप्रिल रोजी रमजान ईद साजरी होईल, असेही सांगितले आहे.

सोलापुरात या ईदगाह मैदानावर होणार नमाज

रमजान ईद निमित्त सोलापूर शहरातील शाही आलमगीर इधगा पानगल स्कूल येथे सकाळी साडेआठ वाजता, होटगी रोड येथील अलमगीर ईदगाह मैदान येथे सकाळी साडेआठ वाजता, जुनी मिल कंपाऊंड आदिलशाही ईदगाह मैदान येथे साडेनऊ वाजता, रंग भवन येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT