Praful Patel: लोकसभा का लढवली नाही: प्रफुल्ल पटेलांनी सांगितले खरे कारण | पुढारी

Praful Patel: लोकसभा का लढवली नाही: प्रफुल्ल पटेलांनी सांगितले खरे कारण

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: अनेक कार्यकर्ते आणि अजितदादा गटातील राष्ट्रवादीने मी निवडणूक लढवावी, अशी विनंती केली होती. भाजपाने सुद्धा आपण स्वतः निवडणूक लढवत असाल, तर विचार करता येईल, असे सांगितले होते. मात्र, राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने मी २०३० पर्यंत खासदार असल्याने निवडणूक लढवली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.५)   माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. Praful Patel

भंडारा मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादी अनेक दिवस तिकिटावरून तिढा कायम होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोंदिया येथे सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्ष एकवटले आहेत. निश्चितपणे आमचा उमेदवार विजयी होईल, असा दावा पटेल यांनी केला. Praful Patel

अमरावतीत खासदार नवनीत राणा प्रकरण हा न्यायिक प्रक्रियेचा भाग होता. आता नवनीत राणा यांना दिलासा मिळाला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. रश्मी बर्वे यांनी संताप व्यक्त केला. न्यायपालिकेवर भाष्य करणे योग्य नाही. न्याय प्रक्रिया सर्व तथ्य तपासून निर्णय देत असते. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेणे योग्य नाही, असे ते म्हणाले. मी कधीही शरद पवारांवर टीका करत नाही. ते आजही आमचे वंदनीय आहेत. तसेच मी कोणावरही अशी वैयक्तिक टीका करत नाही. सगळ्या जागेवर आम्ही चर्चा करून समाधान पूर्वक विचार केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे पूर्वीच 23 खासदार होते. तर शिंदे गटाचे 13 खासदार होते आणि त्यावेळी आमच्याकडे फक्त एक खासदार होता. त्यामुळे सर्व चर्चा आणि वाटाघाटी करून आम्ही जागावाटप केले. नाशिकच्या जागेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना लोकशाहीत त्यांनी आंदोलन केले. तर त्यात गैर काहीच नाही. महायुती सरकार आणि मोदी सरकार योग्य प्रकारे काम करत आहे. ज्यावेळी त्यांची सत्ता होती, त्यावेळी त्यांनी हे प्रश्न का सोडवले नाही? असा सवाल प्रफुल पटेल यांनी उपस्थित केला.

हेही वाचा 

Back to top button