सोलापूर

सोलापूर: देशभरातील २४ स्टार्टअपना मिलींद शंभरकर यांनी दिले नॉमिनेशन

अमृता चौगुले

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : ‍शिक्षण व कौशल्य या क्षेत्रातील स्टार्टअपची निवड करण्यासाठी सोमवारी (दि.10 ऑक्टोबर) झालेल्या स्टार्टअपच्या राज्यस्तरीय सादरीकरण सत्राचे ‍परीक्षक म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची निवड करण्यात आली होती.‍ जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ऑनलाईन सादरीकरण सत्रामध्ये सहभागी होवून विविध स्टार्टअप्सना मार्गदर्शन केले. या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह स्पर्धेत सहभागी स्टार्टअपमधून देशभरातील उत्कृष्ट 24 स्टार्टअपची निवड करण्यासाठी गुणांकन दिले.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी या संस्थेमार्फत नाविन्यपूर्ण द्रुष्टीकोनांना व प्रयत्नांना उत्तेजन देणे, महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उद्योगासाठी पूरक असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये व्यावसायिक वातावरण निर्मिती करुन नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणारी महाराष्ट्र राज्य ‍ नाविन्यता सोसायटी ही संस्था नोडल गर्व्हमेंट एजन्सी म्हणून काम पाहत आहे.

सन 2018 मध्ये सुरु झालेल्या इनोव्हेटीव्ह स्टार्टअप पॉलिसीअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअपच्या इकोसिस्टीमला विविध स्तरावर सहाय्य करण्यासाठी विविध प्रकारे पुढाकार घेण्यात येत आहे. यामधील सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह. यावर्षी 10 आक्टोबर ते 12 आक्टोबर 2022 रोजी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

याअंतर्गत नवउद्योजकांना त्यांची उत्पादने किंवा सेवा सरकारसमोर प्रस्तुत करुन प्रत्येकी 15 लाख रुपयापर्यंतचे 24 शासकीय कार्यादेश मिळण्याची नामी संधी आहे.‍ प्रत्येक वर्षी निवडक 100 स्टार्टअपचे सादरीकरण करण्यासाठी कृषी, शिक्षण व कौशल्य, आरोग्य,शाश्वत विकास, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा आणि गतीशीलता व इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्ती यांची ‍परीक्षक म्हणून निवड करण्यात येत असते. सादरीकरणामध्ये विविध स्तरावरील मान्यवर परीक्षक म्हणून सहभागी झाले.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT