Accident News pudhari photo
सोलापूर

Solapur accident | पाटकूल पाटीजवळ भीषण अपघात; मोटारसायकलची स्पीड गाडीला धडक, एक ठार तर एक जखमी

सकाळच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातामुळे पाटकूल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : पंढरपूरहून मोहोळकडे येत असताना मोटारसायकलची समोरून जाणाऱ्या स्पीट गाडीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात इरफान सलीम कांबळे (वय : ४० वर्षे, रा पंढरपूर) हा जागीच ठार झाला, तर दुसरा अलीम जाकीर शेख (वय : ३० वर्ष, रा. पंढरपूर) गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पाटकूल पाटीजवळ घडला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल नंबर MH 13 C D 2758वरून बकरी घेऊन दोन जण पंढरपूरकडून मोहोळच्या दिशेने येत होते. पाटकूल पाटीजवळ आल्यानंतर त्यांच्या मोटारसायकलची स्पीप्ट गाडी m H 13 BN 6966 गाडीला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की मोटारसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी नॅशनल हायवेच्या ॲब्युलन्स मध्ये घेऊन मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर जखमीला पंढरपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आलेतसेच पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातामुळे पाटकूल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT