job opportunities  file photo
सोलापूर

परदेशात जा अन् करोडपती व्हा, आठवी पास असाल तरी मिळते काम

महिन्याचा पगार लाखोमध्ये

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : रामेश्वर विभूते

परदेशात नोकरी किंवा कामाला जाण्यासाठी डॉक्टर, इंजिनिअरच असले पाहिजे, लाखो रूपये एजंटांना दिले पाहिजेत, अल्पशिक्षित माणसाला काम नसते, असे एक ना अनेक गैरसमज आहेत. परंतु कमी शिकलेला आणि काम करण्याची इच्छाशक्ती असणारा प्रत्येकजण परदेशात जाऊन लाखो रूपये कमवू शकतो. परदेशी भाषेत याला ब्ल्यू कॉलर जॉब म्हणतात. ज्यातून अल्पावधीत करोडपती होता येते.

युरोप, जर्मनी, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, जपान, चीन आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये भारतीय तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आहेत. सुरक्षित आणि कायदेशीर नोकरी मिळवण्यासाठी भारत सरकारचे ई-मायग्रेट पोर्टल हे सर्वात अधिकृत व मुख्य पोर्टल आहे. जे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाद्वारे चालवले जाते. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर या पोर्टलवरही परदेशी नोकऱ्यांचा स्वतंत्र विभाग आहे. सर्वसामान्य कामगारांच्या नोकरींसाठी ब्ल्यू कॉलर जॉब तर अधिकारी वर्गाच्या नोकऱ्यांना गोल्ड व व्हाईट कॉलर जॉब म्हणतात.

नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्यांना सरकारकडून प्रशिक्षणही देण्यात येते. खाडी क्षेत्रात जाणाऱ्या कामगारांसाठी प्री-डिपार्टमेंट ऑररेन्टी ट्रेनिंगची (पीडीओटी) सुरुवात झाली आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रत्येकी दोन आणि कोचीनमध्ये एक प्रशिक्षण केंद्र आहे. अनेक देशांतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना काहीवेळेस एकही रूपया खर्च नाही. कंपनीच्या अटींमध्ये आपण बसलो तर विमानखर्चासह व्हिजा शुल्कही कंपनी भरते.

परदेशात काम करताना मुख्यतः तीन प्रकारचे जॉब आहेत. यात व्हाईट कॉलर जॉब म्हणजे कार्यालयात बसून केले जाणारे मानसिक आणि व्यवस्थापकीय काम. गोल्ड कॉलर जॉब म्हणजे अत्यंत उच्च कौशल्य, विशेष पदवी आणि निर्णय क्षमता असणारे व्यावसायिक. जसे डॉक्टर, शास्त्रज्ञ, वकील व सर्वोच्च अधिकारी तर ब्ल्यू कॉलर जॉब म्हणजे शारीरिक श्रम आणि कौशल्यावर आधारित काम. जसे फॅक्टरी कामगार, मेकॅनिक, ड्रायव्हर्स, बांधकाम मजूर आदींचा यात समावेश असतो. या कामांकरीता परदेशात माणसांची गरज असते.

आधी टिआरसी मग रेसिडेंट

पहील्या वर्षात वर्क परमिटवर काम असते. हा काळ झाल्यावर देश आणि खंडानुसार टेंपररी रेसिडन्स परमिट मिळते. तात्पुरता रहीवासी दाखला मिळतो. सलग पाच वर्षे काम केल्यावर रेसिडेंट परमिट म्हणजे कायमचा रहीवासी दाखला मिळतो, याला काहीजण ग्रीनकार्ड असेही संबोधतात.

ब्ल्यू कॉलर्सला या सुविधा..

ब्ल्यू कॉलर जॉबसाठी कामगाराला आधी केवळ व्हिजा शुल्क, प्रवास खर्च करावयाचा असतो. कामाच्या ठिकाणी गेल्यावर राहणे, एक वेळचे जेवण, तेथील प्रवास खर्च, मोठ्या अपघातावेळी वैद्यकीय खर्च आणि किरकोळ आजारासाठी औषधोपचार पूर्णतः मोफत असतो. व्हाईट व गोल्ड कॉलर जॉबवाल्यांना या सुविधा पैशाच्या रूपात पुरविण्यात येतात.

परदेशात नोकरी शोधताना घ्यायची काळजी...

एजंट किंवा एजन्सीमार्फत अर्ज करताना ईमायग्रेट पोर्टलवर नोंदणीकृत आहे का? याची खात्री करा.

नोंदणी नसलेल्या एजंट्सना पैसे देणे टाळा, यात आर्थिक फसवणूक किंवा व्हिसा फ्रॉड होऊ शकतो.

परदेशात नोकरी देणारे भारत सरकारचे अधिकृत एजंट कधीही आधी पैशाची मागणी करत नाहीत.

अमेरीका, ग्रेट ब्रिटन किंवा अन्य कोणत्याही देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आधी व्हिजा

काढावा लागतो. कंपनीकडून हे पैसे भरले जातात किंवा अगदी कमी पैशात तो ऑनलाईन मिळतो.

काही देशांत स्टीकर व्हिजा तर काही देशात पेपर व्हिजा असतो. या दोन्ही व्हिजात फसवणूक होते

या पोर्टलद्वारेही थेट नोकऱ्या

लिंकडिन, नोकरी डॉट कॉम, बीएवायटी डॉट कॉम, गल्फ जॉब्ज, इंडीड, ओव्हरसिज डॉट कॉम, युरोजॉब्ज, रिलोकेट मी आदी.

या आहेत अधिकृत वेबसाईट emigrate.gov.in , ncs.gov.in , nsdcjobx.com

पीसीसी पासपोर्ट महत्त्वाचा

परदेशात नोकरी मिळवताना पासपोर्ट हा महत्त्वाचा असून त्याच्या व्हॅलिडीटीसाठी त्यावर तीन महिने शिल्लक असावेत. तसेच त्यावर विमानतळावर इमिग्रेशन शिक्का मारण्यासाठी काही पाने शिल्लक असावीत. तसेच काही देशांमध्ये पीसीसी म्हणजे पोलिस क्लिअरन्स सर्टीफिकेट महत्त्वाचे असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT