सोलापूर विमानतळावरुन लवकरच पहिले उड्डाण होण्याची शक्यता Aaron Foster
सोलापूर

सोलापुरातून मुंबई-पुण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून विमानसेवा?

मुंबई, पुणे या दोन शहरांसाठी विमानाचे पहिले उड्डाण होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा

सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना विमान मार्ग निश्चित करण्यासाठी सोलापूर-पुणे आणि सोलापूर-मुंबई असे दोन प्रस्ताव निविदा प्रक्रियेसाठी पाठवले आहेत. साधारण 15 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, पुणे या दोन शहरांसाठी विमानाचे पहिले उड्डाण होण्याची शक्यता आहे.

‘फ्लाय 91’ या कंपनीसोबत इंडिगो कंपनीच्या अधिकार्‍यांनीही रविवार (दि. 29) विमानतळाची पाहणी केली होती. इंडिगो आणि फ्लॉय 91 या दोन कंपन्यांनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. उडान योजना चालू होण्यास डिंसेवर-जानेवारी लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सोलापुरातून विमान सेवा चालू करण्यासाठी विशेष योजनेस मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

विमान कंपन्यांना प्रवाशांच्या तिकिटामागे जे अनुदान दिले जाणार आहे, हे अनुदान राज्य शासन कंपन्यांना देणार आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळावर ओडिशा व आसाममध्ये चालू असलेल्या योजनेच्या धरर्तीवर केंद्र शासनाच्या मदतीशिवाय ही विमान सेवा चालू केली जाणार आहे. राज्य सासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. तोच प्रस्ताव केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडे जिल्हा प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. त्याअनुशंगाने ’फ्लाय 91’ या विमान कंपनीच्या अधिकार्‍यांनी सोलापूर विमानतळाची पाहणी केली. साधराणपणे 15 ऑक्टोबरपासून सोलापूर-पुणे आणिं सोलापूर-मुंबई ही विमानसेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT