दिल्ली विमानतळ दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना २० लाख, जखमींना ३ लाख

केंद्रीय नागरी उड्डायण मंत्र्यांकडून पाहणी
Indira Gandhi International Airport, Delhi
दिल्ली विमानतळाच्या लोखंडी छत कोसळ्यानंतर केंद्रीय नागरी उड्डायण मंत्री राम मोहन नायडू यांनी पाहणी केली. Pudhari News Network

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल- १ वरील लोखंडी छताचा भाग कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू असताना शुक्रवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यामध्ये अनेक वाहनांची नासधूस झाली. या अपघातानंतर केंद्रीय नागरी उड्डायण मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

Indira Gandhi International Airport, Delhi
दिल्ली विमानतळाच्या छत कोसळले; एकाचा मृत्यू, ५ जखमी

Summary

  • इंदिरा गांधी विमानतळाच्या टर्मिनल- १ वरील लोखंडी छताचा भाग कोसळला

  • एकाचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले.

  • अनेक वाहनांची नासधूस, बचावकार्य सुरू

Indira Gandhi International Airport, Delhi
मुख्यमंत्री केजरीवाल यांना जामीन मिळणार? दिल्ली उच्च न्यायालय आज निकाल देणार

अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवून टर्मिनल १ वरील सर्व विमानांचे उड्डाण दुपारी २ वाजेपर्यंत रद्द करण्यात आले. चेक इन काऊंटरही काही काळ बंद होते. अपघातानंतर बचावकार्य सुरू असून आपण जातीने त्यावर लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय नागरी उड्डायण मंत्री राममोहन नायडू यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Indira Gandhi International Airport, Delhi
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाची संयमाने प्रतीक्षा करा

मृतांच्या नातेवाईकांना २० लाख, जखमींना ३ लाखांची मदत

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना २० लाख रुपये आणि जखमींना ३ लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. टर्मिनल एकवरील उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्याचे आणि प्रवाशांना पर्यायी उड्डाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news