मुंगशीत अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर अवकळा, अस्मानी संकटात बेदाण्याचा झाला चिखल file photo
सोलापूर

मुंगशीत अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर अवकळा, अस्मानी संकटात बेदाण्याचा झाला चिखल

बार्शी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Farmers in Mungshi suffer heavy losses due to unseasonal rains

वैराण : पुढारी वृत्तसेवा

बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावात तुफान वादळासह जोराचा अवकाळी पाऊस झाल.

या अवकाळी पावसामुळे अनेकांचे घरावरील पत्रे उडून गेले. तसेच मुंगशी येथील शेतकरी अर्जून श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी जालींदर राऊत यांच्या बेदाणा शेडवर आपला द्राक्षांचा माल टाकला होता. या अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट कागद उडून गेला व झालेल्या अती पावसाने अंदाजे ७ ते ८ टन बेदाण्याचा चिखल झाला. त्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे.

या मुळे वर्षभर पोटच्या लेकरांप्रमाणे संभाळलेली द्राक्ष बाग तसेच ती संभाळण्यासाठी महागडी औषधे, खते, मजुरी यावर झालेला अमाप खर्च करून हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटानी एका क्षणात नाहीसा झाला. यामुळे झालेल्या कर्जाचा डोंगर फेडायचा कसा व पुढील संकटांचा सामाना करायचा कसा हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

त्यामुळे फक्त बेदाण्याचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा देखील चिखल झाल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांचे पीक अजून झाडावर आहे. तरी काहींनी आपला माल शेडवर टाकला आहे. यामुळे झालेल्या या अस्मानी संकटाच्या नुकसानीतून बळीराजा सावरणार कसा हा मोठा प्रश्न आहे. तरी शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे व बेदाणा शेडचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.

अफाट झालेला खर्च, वाढती महागाई यांच्यामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे.
- अर्जून क्षीरसागर , नुकसानग्रस्त शेतकरी मुंगशी
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक शेतकांच्या बेदाण्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने त्वरीत मदत करावी.
- अजय क्षीरसागर , द्राक्ष उत्पादक शेतकरी मुंगशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT