सोलापूर

Dr. Smita Jadhav : पदवीधर-शिक्षकांची वज्रमूठ; डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या उपस्थितीत माळशिरसमध्ये महामेळावा संपन्न

Pune Graduate Teacher constituency Election : डॉ. स्मिता जाधव यांच्याकडून राम सातपुतेंच्या नियोजनबद्ध आयोजनाचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

माळशिरस : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस येथे आयोजित भाजपा-महायुतीचा प्रचार मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या सभेत महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्यासोबत कौस्तुभ गावडे यांनी तालुक्यातील पदवीधर, शिक्षक आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

पदवीधर आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच त्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या कायमस्वरूपी सोडवणुकीसाठी, डॉ. स्मिता योगेश जाधव आणि उमेदवार श्री. कौस्तुभ गावडे यांनी महायुतीचा विजय निश्चित करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला.

या सभेला माळशिरस तालुक्यातील पदवीधर आणि शिक्षकांचा विराट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख घटक पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने या निवडणुकीत महायुतीची अभेद्य एकजूट अधोरेखित झाली. या भव्य मेळाव्याच्या नियोजनबद्ध आयोजनाबद्दल डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी माळशिरसचे माजी आमदार मा. श्री. राम सातपुते आणि सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

व्यासपीठावर दिग्गजांची उपस्थिती

या प्रचार सभेला माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, रावेरचे माजी आमदार अमोल जावळे, माजी शिक्षक आमदार भगवान (आप्पा) साळुंखे, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजपा ज्येष्ठ नेते सोपानकाका नारनवर, भाजपा वरिष्ठ नेते अमरसिंह माने देशमुख, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष शरद मदने, अकलूज मंडल अध्यक्ष सुजयभैय्या माने पाटील, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहिते, पिलीव मंडल अध्यक्ष संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, नातेपुतेचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत आणि भाजप पदाधिकारी सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच शिवसेना नेते राजकुमार हिवरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर ग्रामीण अध्यक्ष अक्षय भांड, धनगर कृती समिती महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ, पंचायत समिती सदस्य राहुल रुपनवर, आनंद शेंडगे, नम्रता शिवराज पोकळे यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT