Dr. Smita Jadhav : डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे पदवीधरांच्या भविष्याचे व्हिजन

जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे व उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांचा विश्वास
Dr. Smita Yogesh Jadhav
Dr. Smita Yogesh JadhavPudhari News
Published on: 
Updated on: 

सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजप-महायुतीने उच्चशिक्षित आणि अनुभवी उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना संधी दिली आहे. पदवीधरांच्या समस्या, तरुणांचे भविष्य आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्याचे स्पष्ट व्हिजन आहे. त्यांच्या माध्यमातून पदवीधरांचे विविध प्रश्‍न मार्गी लागतील, असा विश्वास जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांनी व्यक्त केला. तसेच पदवीधर मतदारांनी डॉ. स्‍मिता जाधव यांना विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त करताना त्यांनी आपली भूमिका मांडली. डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उच्चशिक्षित आणि नवीन चेहरा असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि कामाचा अनुभव लक्षात घेता त्या पदवीधरांच्या प्रश्नांना योग्य न्याय देऊ शकतील. त्‍यांना शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे.

पदवीधरांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याची क्षमता त्‍यांच्याकडे आहे. पदवीधरांना केवळ प्रतिनिधित्व मिळणे महत्त्वाचे नसून त्यांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व मिळणे आवश्यक आहे. डॉ. स्मिता जाधव यांच्या माध्यमातून ही अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. प्रिया शिंदे यांनी व्यक्त केला.

राजूभैया भोसले म्हणाले, भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून अत्यंत उच्चशिक्षित डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देऊन पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या काळात तरुणांसमोर रोजगार, करिअरच्या संधी आणि भविष्यातील स्थैर्य असे अनेक प्रश्‍न आहेत. या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करण्याची अपेक्षा डॉ. जाधव यांच्याकडून आहे. डॉ. स्मिता जाधव यांचा विजय निश्‍चित असून, त्यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही राजूभैया भोसले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news