Swami Samartha Mandir Akkalkot Pudhari
सोलापूर

Akkalkot Guru Purnima 2026 | गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तिमय वातावरण! दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Akkalkot Swami Samarth Mandir | याकरिता अक्कलकोट नगरपालिका, पोलिस प्रशासनासह स्वामीसेवक सज्ज झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Akkalkot Guru Purnima 2026 News In Marathi

अक्कलकोट : शिवा याळवार

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, श्री राजेराय मठ, श्री गुरू मंदिर, श्री स्वामी समर्थ समाधी मठ यासह विविध मंदिरांत मोठ्या भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. याकरिता अक्कलकोट नगरपालिका, पोलिस प्रशासनासह स्वामीसेवक सज्ज झाले आहेत.

श्री वटवृक्ष मंदिरात पहाटेपासून कार्यक्रम

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नित्य नियमाने होणारी काकडआरती पहाटे होईल. सकाळी नैवेद्य आरती होईल. त्यानंतर सर्व स्वामी भक्तांसाठी दुपारी १२ पासून महाप्रसाद देण्यास सुरुवात होईल. रात्री साडेआठ वाजता शेजारती होईल.

अन्नछत्र मंडळात ११ वाजल्यापासून महाप्रसाद

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंhraजे भोसले व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गुरुपौर्णिमेनिमित्त आज बुधवारी महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप,

श्री गुरूपूजा, महाआरती व महानैवेद्य हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ११ पासून आज महाप्रसाद देण्यास सुरुवात होणार आहे. दुपारी चार वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका न्यासाने सुशोभित केलेल्या रथातून दिंड्यासह विविध वाद्यांच्या गजरात निघणार आहे.

श्री राजेराय मठात अभिषेक

श्री राजेराय मठ येथे पहाटे नामस्मरण, नगर प्रदक्षिणा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका व परमपूज्य सद्गुरू बेलानाथ बाबांच्या समाधीचे पूजन होईल.

सकाळी श्री स्वामी समर्थ सहस्र नामावली पठण, चैतन्य पादुकावर व श्रींच्या समाधीवर समुदायिक अभिषेक महाआरती होईल. दुपारी महाप्रसाद आहे. गुरुवारी (दि. ३०) गोपाळकाल्याने कार्यक्रमाची सांगता होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT