सातारा : पुढारी वृत्तसेवा
काही वर्षांपूर्वी गर्भलिंग निदान आणि वंशाला दिवा हवा, अशा मानसिकतेतून मुलींची गर्भातच हत्या केली जायची. पण, अलिकडे हे चित्र बदलले आहे. कायद्याने गर्भलिंग निदानावर बंदी असून लोकांचीही मानसिकता बदलली आहे. परिणामी समाजात मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. सातारा जिल्ह्यात हे प्रमाण दर हजार मुलांमागे 921 मुलीं इतके झाले आहे.
कायद्याने गर्भलिंग निदानावर बंदी आणली आहे. एखाद्याने गर्भलिंग निदान केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात आहे. या कायद्याची जरब आणि मुलींची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती यामुळे आता लोकांचीही वंशाला दिवा हवा ही मानसिकता बदलत चालली आहे. त्यामुळे मुलींना गर्भातच मारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या सर्व गोष्टींमुळे मुलींच्या जन्मदराबाबत येथे चांगली स्थिती निर्माण झाली आहे. तरीही काहीजण आजही चोरी-छुपे गर्भलिंग निदान करतात, ही मात्र वस्तुस्थिती आहे.
- 22-2-22 या तारखेचे औचित्य साधत इस्लामपुरात एकाचवेळी भरला 35 जुळ्यांचा मेळा
जिल्ह्यात मुलींची संख्या वाढू लागली आहे. एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या 10 महिन्यांमध्ये 18 हजार मुले आणि 16 हजार 600 मुलींचा जन्म झाला आहे. यामुळे हे प्रमाण दर हजारांमागे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 921 एवढे झाले आहे. मार्चअखेरपर्यंतच्या वर्षाचा विचार करता मुलींच्या जन्मदराचे प्रमाण आणखी वाढू शकते. सातारा जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचा विचार करता खटाव तालुक्याची स्थिती चांगली आहे. खटावमध्ये मुलांपेक्षा मुली अधिक जन्मल्या आहेत. हजारामागे मुलींचा जन्मदर हा 1023 एवढा आहे. यानंतर खंडाळ्यातील प्रमाण 968 असून कराड आणि सातारा तालुक्यात हे प्रमाण 924 इतके आहे. तर, फलटण तालुक्यात मुलींचा जन्मदर सर्वात कमी राहिला. दर हजार मुलांमागे तालुक्यात फक्त 780 मुली आहेत.
व्हिडिओ पहा :
बौद्ध धर्मातील तीन पंथांसह दात्यांचे शिल्प, औरंगाबाद (राजताडगा) लेणीचे वेगळेपण
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.