कराड : पुढारी वृत्तसेवा: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीविरोधात आज दुपारी कराड शहरात सायकल रॅली काढण्यात आली. सायकल रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सातारा येथे इंधन दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अधिक वाचा
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य अँड. उदयसिंह पाटील, बॅटरी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, निवासराव थोरात, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष भास्कर देवकर, नगरसेवक इंद्रजीत गुजर, झाकीर पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.
हेही वाचलंत का?