सातारा

मिशा पिळल्या…दंड थोपटले; विजयानंतर शिवेंद्रराजेंचा साताऱ्यात जलवा

निलेश पोतदार

सातारा; पुढारी वृत्तसेवा साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आय ॲम द किंग असल्याचे शिवेंद्रराजेंनी दाखवून दिले. संपूर्ण महाराष्ट्रासह साताऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांच्या माध्यमातून बाजार समितीच्या निवडणुकीत शिवेंद्रराजेंना पराभूत करण्याची रणनीती आखली होती.

प्रत्यक्ष स्वतः पॅनल न उभे करता शेतकरी संघटनेला तुम्ही पुढे चला आमचा आरमार तुमच्या बरोबर आहे असे सांगत थेट निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताकद दिली.

मात्र निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या देखील झाडल्या अत्यंत चुरशीची आणि शिगेला पोचलेल्या या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत ते निकाल बाहेर येईपर्यंत संपूर्ण सातारा जिल्ह्याला या निकालाची उत्सुकता होती. दरम्‍यान एक मे महाराष्ट्र दिनाला सकाळच्या सत्रातच पटापट निकाल बाहेर आले आणि विरोधकांचा फुगा फुटला. निकाल बाहेर येताच शिवेंद्रराजेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. एकच राजे बाबा राजे म्हणत शिवेंद्रराजांच्या कार्यकर्त्यांना विजयाच्या उत्साहात आकाश ठेंगणे वाटू लागले.
तितक्यात 18/० चा नारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रत्यक्ष मैदानात किंग मेकर शिवेंद्रराजे उतरले. शिवेंद्रराजे निवडणूक निकाल मैदानात येताच कार्यकर्त्यांना उत्साहाला उधाण आले. शिवेंद्रराजेंना हजारो कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत गुलालाची उधळण करत जणू विधानसभेचा माहोलच तयार केला.

निवडणूक बाजार समितीची मात्र लढाई अस्तित्वाची सातारी ताकतीची व शिवेंद्रराजेंच्या इमेजची अशी जोर जोरात नारेबाजी करण्यात आली. शिवेंद्रराजेंच्या जय जयकारने संपूर्ण निकालाची नगरी दणाणून गेली.

दोन्हीही हाताची व्हिक्टरी करत नकळत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या दिशेने दाखवली. उत्साहात भारावून गेलेल्या कार्यकर्त्यांना आनंदाचा जल्लोष आवरेना. यातच शिवेंद्रराजेंनी आधी आपल्या मिशीला पीळ दिला, नंतर दंड थोपटला, व, साताऱ्यात कार्यकर्त्यांच्या उत्साहात आपला जलवा दाखवून दिला.

आ देखे जरा किसमे कितना है दम अशी बॉडी लँग्वेज शिवेंद्र राजांची कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात डोक्यावर घेतल्यानंतर होती. कार्यकर्त्यांचा उत्साह उत्तर देत शिवेंद्रराजेंनी पिळलेल्या मिशा ,आणि थोपटलेल्या दंड आगामी काळातल्या निवडणुकींचा इशारा होता, सातारा जिल्ह्यात उदयनराजे यांची आता ताकद राहिली नाही. सगळे किल्ले काबीज केले आहेत असे सांगितले. आपल्या स्टाईलने सातारच्या राजकारणात आपलाच दरारा आहे हे त्‍यांनी दाखवून दिले.

शिवेंद्रराजेंनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या जनसमुदायात गुलालाच्या उधळणीत पिळलेल्या मिशा आणि थोपटलेला दंड आगामी काळातल्या प्रत्येक निवडणुकीच्या आणि रणनीतीचा एक आगाज होता असेच या निमित्ताने दिसून आले. या सर्व डॅशिंग स्टाईलने विरोधकांनीही शिवेंद्रराजेंचा धसका घेतला.

कारण सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रारंभी ज्या पद्धतीने उदयनराजेंच्या पाठिंब्‍या नंतर व्हीआयपी झाली होती. त्या व्हीआयपी झालेल्या निवडणुकीची निकालानंतर शिवेंद्रराजेंनी हवाच काढून घेतली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT