सातारा

सातारा : फलटण तालुक्यात दोन गटात तुफान हाणामारी; घर, वाहने, जनावरांचा गोठा पेटवला

backup backup

लोणंद; पुढारी वृतसेवा : फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एक घर, वाहने, जनावरांचा गोठा पेटवून दिल्याने मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरेवाडी (ता . फलटण) येथे रस्त्याच्या व घराच्या बांधकामाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी झाली. एका गटाकडून लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आली. एका गटाने घर, पिकअप, स्कुटी, दोन ट्रॅक्टर, धान्य साठा, जनावरांचा गोठा इत्यादींना आग लावली. तर दुसर्‍या गटाने घराचे नवीन बांधकाम पाडून नुकसान केले. दोन्ही बाजूकडील दहा जण जखमी झाले. या मारामारी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी लोणंद पोलिसात दाखल असुन बेचाळीस जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सपोनि विशाल वायकर व सहकारी करीत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT