सातारा : गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आणि पावित्र्याचे स्थान. मात्र, काही समाजकंटक हे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय नुकताच किल्ले रायरेश्वरच्या (Raireshwar Fort) पायथ्याशी आला, जिथे काही परप्रांतीय तरुण रस्त्याच्या कडेला दारू पार्टी करत असताना आढळले.
रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जात असलेल्या शिवप्रेमींना हा प्रकार दिसला. या तरुणांचे हे कृत्य पाहताच शिवप्रेमी संतप्त झाले. त्यांनी त्वरित आक्रमक भूमिका घेत दारू पार्टी करणाऱ्या त्या परप्रांतीय तरुणांना चांगलाच चोप दिला.
गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी शिवप्रेमींनी दाखवलेला हा आक्रमकपणा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे गड-किल्ल्यांच्या ठिकाणी होणाऱ्या अशा गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्याच्या भूमिकेमुळे शिवप्रेमींनी घेतलेल्या या कठोर भूमिकेचे परिसरात समर्थन केले जात आहे.